

Indian Succession Act Will Rules
esakal
प्रत्येक अशी मालमत्ता किंवा त्यातील हिस्सा, जो इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीच्या (वंशपरंपरेने मिळालेला किंवा स्वतः संपादित केलेला) स्वतंत्र मालकीचा आहे, तो चल असो वा अचल, दृश्य (tangible) किंवा अदृश्य (intangible), उच्च बाजारमूल्य असो किंवा इच्छापत्र करणारा यासाठी भावनिक मूल्य असो, तो इच्छापत्राद्वारे वाटू शकतो. एखाद्या साध्या वस्तूंपासून ते अचल संपत्ती/पेटंट, ट्रेडमार्कपर्यंत सर्व काही इच्छापत्राअंतर्गत देणे शक्य आहे. याशिवाय, अल्पवयीन मुलांच्या काळजीसाठी पालनकर्ता नेमणे, दिव्यांग वा अवलंबून असलेल्या व्यक्तीसाठी तरतूद करणे, कर्जफेड, गहाणखत, अंत्यविधीची व्यवस्था, अवयवदान, संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी ट्रस्टची तरतूदही इच्छापत्राद्वारे शक्य आहे.
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि॥
अर्थात, ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा पुनर्जन्मही निश्चित आहे. त्यामुळे जे अटळ आहे त्यावर शोक करू नये. परंतु, आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीची योग्य पद्धतीने विभागणी व्हावी, आपल्या वारसांना आपल्याला अपेक्षित प्रकारे वाटप व्हावे, यातून वाद उद्भवू नयेत असे वाटत असेल, तर इच्छापत्र (विल) करणे अत्यावश्यक आहे.