

Artificial Intelligence
esakal
तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शेवटी ते एक मशीन आहे. त्याला जाणीव, भावना किंवा नैतिक जबाबदारीची समज नसते. भविष्यात ‘चॅटबॉट्स’ अधिक हुशार होतीलही; पण जोपर्यंत त्यांच्यात ‘विवेका’ची ठिणगी पडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारताना डोळे आणि कान उघडे ठेवणेच उत्तम. शेवटी कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी बुद्धिमत्तेला पर्याय नाही हे विसरून चालणार नाही.