

Amazon layoffs 14000
esakal
कल्पना करा, की तुम्ही कामावर गेला आहात आणि तुम्हाला अचानक समजलं की कंपनीला आता तुमची गरज राहिली नाही आणि उद्या पासून तुम्हाला घरी बसायला सांगितलं जात आहे! अशा परिस्थितीत तुमची काय अवस्था होईल? जगाच्या ई-कॉमर्सवर ज्यांचं एकहाती वर्चस्व आहे, त्या ॲमेझॉनच्या तब्बल १४ हजार कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. एआय आणि रोबोटिक्सने घेतलेला वेग इतका भयंकर आहे की ॲमेझॉनच्या, गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट या बलाढ्य कंपन्यांच्या छत्रछायेत सुध्दा सुरक्षितता राहिलेली नाही तिथं छोट्या मोठ्या कंपन्यांविषयी काय बोलणार? एवढंच नाही तर जगप्रसिध्द व्यवस्थापन सल्लागार कंपनी मॅकिंझेचा अहवाल सांगतोय की, येणाऱ्या काही वर्षात ३० कोटीहून अधिक नोकऱ्यांचं स्वरूपच पूर्णपणे बदलणार आहे
कामाचं स्वरूप बदलणार म्हणजे डेटा ट्रेनर, प्रॉम्प्ट इंजिनिअर, एआय ऑडिटर, अल्गोरिदम एथिक्स ऑफिसर, एआय मॉडेल डिझायनर अशा नवीन क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची मागणी झपाट्याने वाढणार आहे. तुम्ही वेळेत कौशल्य शिकलीत, तर एआय तुमचा शत्रू नही तर मित्र बनेल. त्यामुळे तुम्हाला माहित असायला हवं की, कंपन्या कर्मचाऱ्यांना का काढत आहेत? एआयमुळे कोणती कामे गायब होणार आणि कोणती नवीन निर्माण होणार? एआयचा वेग वाढत असताना कोणती कौशल्ये शिकायला हवीत? आणि ही सगळी माहिती तुम्हाला सकाळ+च्या या लेखात वाचायला मिळणार आहे