AI Regulation & Labelling
Esakal
पर नही, अब साला मूड नही...
आखे मुंद लेने मे हि सुख है, सो जाने मे हि भलाई है.
पर उठेंगे किसी दिन..
उसी गंगा किनारे डमरू बजाने को..
उन्ही बनारस के गलियो मे दौड जाने को, किसी झोया के इश्क मे फिर से पड जाने को..!
हा डायलॉग आठवतोय..? २०१३ साली आलेल्या रांजना चित्रपटातला. आजही रांजनासारखे सुपरहीट चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. पण हा डायलॉग म्हणून रांजनामधला तो कुंदन अचानक जिवंत झाला तर..?. तर नाही. तो होणारच आहे..! रांजनाच्या नव्या सिक्वलमध्ये. जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केला जातोय. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून यावरून एआय जनरेटेड कॉन्टेंट विषयी अनेक वादही सुरू झालेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने केलेला कॉन्टेंटची मालकी नेमकी कोणाची, त्याची जबाबदारी कोणाची, खरं खोटं कसं ओळखायचं.. असे सगळेच प्रश्न आता सरकारदरबारी येऊन पोचलेत. यावर सरकारने त्यांच्या परीने नियम घालण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आता यावरूनही वाद सुरू झाले आहेत. एआय जनरेटेड कॉन्टेंटच्या बाबतीत कोणता कायदा येऊ घातलाय आणि या घडीला तो कोणत्या स्थितीत आहे जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखातून..!