
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं बोइंग ७८७ काल १२ जून रोजी उड्डाणानंतर लगेचच कोसळलं. यामध्ये तब्बल २४२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. इतकंच नव्हे तर विमान बी जे मेडिकल कॉलेजच्या या इमारतीवर कोसळलं तिथेही अनेकांचा मृत्यू झाला. या अपघाताची तीव्रता इतकी होती की प्रचंड मोठा स्फोट होऊन अक्षरश: विमानातील काहीच शिल्लक राहिले नाही. अपघाताच्या ठिकाणी नुसते अवशेष विखरले होते.
बोइंग ७८७वर कालपासून बरेच आरोप होतायत पण ते नेमके काय आहेत, बोइंगमध्ये अशा कोणत्या त्रुटी होत्या, ज्याचा या उड्डाणाला फटका बसला? अमेरिकेत या विमानांची चौकशी का सुरू होती आणि इतकं असूनही विमानांचं उड्डाण का सुरू होतं, या सगळ्याविषयी सविस्तर आणि नेमकी माहिती वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.