

Antah Asti Prarambh
esakal
अनेकदा आयुष्यात आलेल्या संकटांमुळे माणूस खचून जातो. सगळं संपलं, अशी त्याची भावना होते. मात्र, आलेल्या संकटाला जिद्दीने सामोरे गेल्यास नवी सुरुवात होऊ शकते. अनेकदा आपण पाहतो, की पूर्णपणे वठलेल्या झाडालादेखील पावसाच्या शिडकाव्याने नवी पालवी फुटते. अंतः अस्ति प्रारंभः हे संस्कृतमधील वचन हाच संदेश देते. कोणताही शेवट हा नवी सुरुवात आहे, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.