Artificial Sweetener : त्या मुलीच्या मृत्यूच्या कारणाचा केकमधील 'आर्टिफिशियल स्वीटनर' शी संबंध?

स्वतःच्याच वाढदिवसाचा केक खाऊन पटियालातील शाळकरी मुलीचा झाला होता मृत्यू
artificial sugar
artificial sugarEsakal

मुंबई: स्वतःच्या वाढदिवसाचा केक खाल्यानंतर जीव गमवावा लागणाऱ्या १० वर्षीय मुलीच्या मुत्यूचा संबंध हा केक मधील 'आर्टिफिशियल स्वीटनर' म्हणजेच कृत्रिम साखरेशी असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याच वाढदिवसाचा केक खाऊन झाल्यानंतर पटियाला येथील एका शाळकरी मुलीला रात्रीतून त्रास सुरु झाला होता.

त्यावेळी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्याआधीच तिचा मुत्यू झाला होता. दरम्यान वाढदिवसाचा केक खाऊनच मुलीसह घरातील तिच्या नातेवाईकांना देखील त्रास झाला असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता.

ज्या बेकारीतून त्यांनी केक घेतला त्यातील केकच्या सॅम्पल मध्ये 'आर्टिफिशियल स्वीटनेस' जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच आता हा आर्टिफिशियल स्वीटनेस काय प्रकार आहे? केकमध्ये हा घटक कशासाठी वापरला जातो? त्यात असे नेमके कोणते घटक असतात? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com