

Wari and Youth: Why Pandharpur Pilgrimage Still Inspires Young India
E sakal
Pandharpur Wari: The Spiritual Tradition That Shapes India's Youth
तरुणाई हा शब्दच ताजातवाना आहे. तरुण जे करतात त्यावरच हे जग घडत वा बिघडत असते, असे म्हटले जाते. तरुणाईतली उर्जा, शक्ती सकारात्मक मार्गाला लागणं मात्र फार गरजेचं आहे. आज आपण आजूबाजूला पाहिले तर धस्स होते कारण कुसंस्कार, असंयम, चंगळवाद, पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण या मत्कुण संगतीने हा हिरा दुभंगेल की काय ? अशी भीती वाटते.
मात्र अनेक तरुण आवडीने वारीलाही येताना दिसतायत. वारी हा तरुणाईपुढे असलेला आणि उरलेला सर्वोत्तम पर्याय आहे. वारी तरुणाईचे संगोपन करील, संवर्धनही करील आणि संरक्षणसुद्धा. मुळात वारी हे साधन तारुण्यातले आहे किंबहुना तारुण्यासाठीच आहे.