Premium|Stock market picks : आगामी वर्षात 'हे' दोन शेअर्स देणार बंपर परतावा; मोतीलाल ओसवालच्या तज्ज्ञांचा गुंतवणुकीचा महत्त्वाचा सल्ला

Motilal Oswal Stock Recommendations : भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढता वेग आणि धोरणात्मक सुधारणांमुळे बँकिंग व वाहन उद्योगातील निवडक शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरत आहेत. एयू स्मॉल फायनान्स बँक आणि संवर्धन मदरसन या कंपन्यांनी दीर्घकालीन वाढीचे संकेत दिले असून गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे.
Stock market picks

Stock market picks

esakal

Updated on

सिद्धार्थ खेमका - मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.

भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढता वेग, तांत्रिक बदल आणि धोरणात्मक सुधारणा यांच्या पार्श्वभूमीवर काही निवडक कंपन्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विशेष आकर्षक ठरत आहेत. बँकिंग, वाहनउद्योग, विमा, पाणी प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्मिती, लॉजिस्टिक्स, क्विककॉमर्स, दूरसंचार या विविध क्षेत्रांतील कंपन्या मजबूत व्यवसाय मॉडेल, सातत्यपूर्ण वाढ आणि भविष्यातील संधींच्या जोरावर गुंतवणूकदारांना स्थिर परताव्याची क्षमता दर्शवतात. अशा क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा असलेल्या कंपन्यांचा आढावा येथे घेतला आहे.

(उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षित कालावधी : एक वर्ष) एयू स्मॉल फायनान्स बँक (उद्दिष्ट : रु. १२५०)

एयू स्मॉल फायनान्स बँक सक्रियपणे सार्वत्रिक बँकिंग परवान्याचा पाठपुरावा करत आहे. त्यामुळे तिचे जोखीम वितरण अधिक विस्तारेल, निधीचा खर्च कमी होईल आणि व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोचता येईल. बँकिंग सेवा न मिळालेल्या घटकांना तसेच राजस्थान,

गुजरात आणि छोट्या बाजारपेठांना सेवा देण्याच्या क्षमतेमुळे ही बँक पुढील काही दशके प्रगतिपथावर राहील. दीर्घकालीन दृष्टिकोनातून बँकेच्या कर्जवितरणाचा चक्रवाढ वार्षिक विकासदर २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. बँकेने रिटेल ठेवींचा भक्कम पाया उभारला असून, तो दीर्घकालीन शाश्वततेसाठी महत्त्वाचा प्रेरक घटक ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com