
Bacchu Kadu 1997 election
esakal
बच्चू कडू
Bacchuprahar41@gmail.com
पंचायत समितीचं पाच वर्षांचं काम संपताना मी एक धडा शिकलो. राजकारण म्हणजे खेळ नाही. ते जबाबदारीचं रणांगण आहे. माझ्यासाठी १९९७ची पंचायत समितीची निवडणूक महत्त्वाची होती. ती फक्त निवडणूक नव्हती, तर माझ्या आयुष्याची वळण घेणारी गोष्ट ठरली.
त्रांनो, काही प्रसंग असे असतात, की ते घडल्यानंतर माणूस जसा होता तसाच राहत नाही. माझ्यासाठी १९९७ची पंचायत समितीची निवडणूक तशीच होती. ती फक्त निवडणूक नव्हती, तर माझ्या आयुष्याची वळण घेणारी गोष्ट होती. तेव्हा चांदूर बाजार पंचायत समितीचे सभापती होते स्व. नानासाहेब देशमुख आणि उपसभापती स्व. बाबूराव जवंजाळ. त्यांचा कार्यकाळ संपला आणि नवीन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्या वेळी महाराष्ट्रभर शिवसेना-भाजप युतीचा गजर होता आणि मी शिवसेनेचा तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत होतो. माझं संघटन तयार होतं, लोकांशी नाळ जुळली होती.