Premium|Bank Statement Transaction Details : बँक स्टेटमेंटमधील अस्पष्ट नोंदींचा फटका; जुन्या व्यवहारांचा हिशेब कसा द्याल?

Digital Banking Record Keeping : डिजिटल बँकिंगमुळे आर्थिक व्यवहार सोपे झाले असले, तरी बँक स्टेटमेंटमधील अस्पष्ट नोंदींमुळे जुन्या व्यवहारांचा उद्देश स्पष्ट करताना करदाते आणि ज्येष्ठ नागरिक अडचणीत येऊ शकतात.
Bank Statement Transaction Details

Bank Statement Transaction Details

esakal

Updated on: 

सुहास दंडे - suhasdande@gmail.com

डिजिटल बँकिंगमुळे व्यवहार करणे सोपे झाले; मात्र त्या व्यवहाराचा नेमका उद्देश काही महिन्यांनी किंवा वर्षभराने शोधायची वेळ आली, तर खातेदारांची चांगलीच तारांबळ उडते. पासबुक किंवा बँक स्टेटमेंटमधील त्रोटक, अस्पष्ट नोंदींमुळे स्वतःच्याच पैशांचा स्रोत आणि व्यवहाराचे कारण सिद्ध करण्याची वेळ करदात्यावर येऊ शकते. विशेषतः कर्जाची परतफेड, भेटवस्तू, मालमत्ता विक्री किंवा गुंतवणुकीशी संबंधित व्यवहारांमध्ये ही समस्या अधिक गंभीर ठरते. त्यामुळे बँक खात्यातील प्रत्येक नोंद केवळ रकमेची नसून, तिच्या व्यवहाराच्या उद्देशाचीही स्पष्ट ओळख देणारी असणे गरजेचे आहे.

आपल्या देशात गेल्या दशकभरात डिजिटल आणि बँकिंग व्यवहारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पैसे देणे-घेणे अत्यंत सोपे झाले असले, तरी वर्षाअखेरीस आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्याची वेळ येते, तेव्हा एक मोठी अडचण समोर उभी राहते, ती म्हणजे बँक पासबुक किंवा खात्याच्या विवरणपत्रातील अस्पष्ट आणि त्रोटक नोंदी! एक एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षातील प्रत्येक व्यवहाराची नोंद आपल्या खात्यांच्या पुस्तकात ठेवावी लागते. मात्र, ऑनलाइन किंवा धनादेशाद्वारे केलेले व्यवहार नेमके कोणाला आणि कशासाठी केले, याचा स्पष्ट उल्लेख पासबुकमध्ये अनेकदा नसतो. ऑनलाइन बँकिंगमध्ये व्यवहाराचा तपशील लिहिण्यासाठी बँकांकडून मर्यादित जागा किंवा अक्षरसंख्या दिली जाते. त्यातही बँक पासबुकमध्ये नोंद छापताना हा तपशील आणखी कमी होऊन अत्यंत त्रोटक स्वरूपात दिसतो. वर्षभरानंतर जेव्हा सनदी लेखापाल (सीए) किंवा प्राप्तिकर अधिकारी एखाद्या व्यवहाराचा खुलासा विचारतात, तेव्हा अनेक महिन्यांपूर्वी केलेला व्यवहार नेमका कशासाठी केला होता, हे आठवणे कठीण जाते. बँकेकडे चौकशी केली, तरी प्रत्येक वेळी अपेक्षित सहकार्य मिळेलच असे नाही. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com