
Gold investment options
esakal
सण-उत्सवाचा माहोल सुरू आहे! नवरात्रीचा उत्साह संपतो न संपतो तोच, अवघ्या काही दिवसांत आपल्या लाडक्या दिवाळी ची लगबग सुरू होते. आणि दिवाळीच्या तोंडावर येणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी सोनं खरेदी करणं आपल्याकडे एक पवित्र परंपरा मानली जाते. असं म्हणतात की या दिवशी घरात सोनं आणल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन-समृद्धी नांदते.
पण खरंतर, सोनं खरेदी करणं म्हणजे फक्त परंपरा जपण्यापुरतं नसतं, तर ती एक स्मार्ट गुंतवणूक आहे असं म्हणता येईल. महागाईच्या काळात सोनं नेहमीच आपल्या संपत्तीची किंमत टिकवून ठेवतं, म्हणूनच याला Inflation Hedge असंही म्हणतात; म्हणजे महागाईतला संरक्षक. तुम्ही पहिल्यांदाच सोनं खरेदी करत असाल किंवा अनुभवी गुंतवणूकदार असाल, तर तुमच्या गरजा आणि उद्दिष्टांनुसार सोन्याचा योग्य प्रकार निवडणं खूप महत्त्वाचं आहे.
आज या 'सकाळ प्लस'च्या लेखातून जाणून घेऊया सोन्यात गुंतवणूक करण्याचे ५ खास आणि सोपे मार्ग!