Premium|Bharatmata Cinema : गिरणगावचा डौल परतला! 'भारतमाता' चित्रपटगृहाचा कायापालट; पण मराठी चित्रपटांचे काय होणार?

Marathi Movies Mumbai : मुंबईतील गिरणगावाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले ‘भारतमाता’ चित्रपटगृह आता नव्या रूपात सज्ज झाले असून, मराठी बाणा जपण्यासोबतच हिंदी चित्रपटांची जोड देत हे ‘मराठी चित्रपटांचे मंदिर’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दिमाखात रुजू होत आहे.
Marathi Movies Mumbai

Marathi Movies Mumbai

esakal

Updated on

संतोष भिंगार्डे - santosh2007b@gmail.com

गिरणगावातील ‘भारतमाता’ चित्रपटगृहाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अनेक चित्रपटांनी इथे रौप्य आणि सुवर्णमहोत्सव साजरा केला. मुंबईत हिंदी चित्रपटांचे वारे वाहत होते तेव्हाही ‘भारतमाता’ने ‘फक्त मराठी’ अशी ओळख जपली. आता ‘भारतमाता १ सिनेमा’ नावाने ते नव्या रूपात प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होत आहे. तिथे आता मराठीबरोबरच हिंदी चित्रपटही लागणार आहेत. मराठी चित्रपटांचे मंदिर अशी ओळख असलेल्या ‘भारतमाता’ने मराठमोळा बाणा जपावा, हीच अपेक्षा.

सिंगल स्क्रीनकडे एकेकाळी मनोरंजनाचे प्रमुख साधन म्हणून पाहिले जात होते. देशभरात सिंगल स्क्रीनचे जाळे चांगलेच विणलेले होते. एकेकाळी देशभरात सिंगल स्क्रीनची संख्या १४ हजार होती. महाराष्ट्रात अशी १,२०० चित्रपटगृहे होती. हिंदीबरोबरच मराठी व अन्य भाषिक चित्रपट तिथे प्रदर्शित होत होते. कित्येक चित्रपट रौप्य अन् सुवर्णमहोत्सवी यश साजरे करीत होते. अशा सिंगल स्क्रीनमुळेच कित्येक कलाकार नावारूपाला आले. अनेकांना स्टारडम प्राप्त झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com