Big Bash League privatisation explained
esakal
Big Bash League private investment Australia : इंडियन प्रीमिअर लीगमधील फ्रँचायझी मालकांना गुंतवणूक करण्यासाठी आता आणखी एका लीगमधील मार्ग मोकळा झाला आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीग, SAT20, दी हंड्रेड, इंटरनॅशनल लीग ट्वेंटी-२०, मेजर लीग क्रिकेट आदी परदेशी व्यावसायिक लीगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या IPL फ्रँचायझींना ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही ( BBL) आपला व्यावसाय वाढवता येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने BBL मध्ये खाजगी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. पण, या निर्णयाचा आयपीएल फ्रँचायझींना कसा फायदा होणार आणि पडद्यामागून शिजत असलेला छुपा हेतू कसा साध्य होईल, या प्रश्नांची उत्तंर 'सकाळ प्लस' च्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.