

labour migration in bihar elections
esakal
मधुबन पिंगळे
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये स्थलांतर (स्थानिक भाषेमध्ये पलायन) हा सर्वांत प्रमुख मुद्दा झाला आहे. विकासाचा अभाव, रोजगार किंवा औद्योगिक विकासासाठी अपेक्षित पायाभूत सुविधा नसल्यामुळे बिहारमधील तरुण अन्य राज्यांकडे स्थलांतर करतात. अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून, या निवडणुकीमध्ये जातीपातीच्या समीकरण, गुन्हेगारी, न झालेला विकास या मुद्द्यांबरोबरच यावेळच्या निवडणुकीत ‘पलायन’ हा मुख्य मुद्दा होऊ पाहत आहे.