
संजय कुमार
सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवीत देशातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, जनसंघापासून सुरुवात झालेला भाजपचा हा प्रवास खूपच आव्हानात्मक होता. शहरी व उच्चवर्णीय मतदारांचा पक्ष अशी असणारी ओळख पुसून भाजपने समाजातील सर्व थरांतील मतदारांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे
देशातील राजकारणावर चर्चा करत असताना, भारतीय जनता पक्षाची चर्चा करावीच लागते. स्वातंत्र्यापासूनच आजपर्यंतचा प्रवास पाहता, भाजपने वेगवेगळ्या टप्प्यांमधून गेला आहे. या काळामध्ये भाजपचे केवळ नावच बदलले नाही, तर पक्षाच्या सामाजिक आधारामध्येही मोठे परिवर्तन झाले आहे.