
Bollywood’s big-budget films to watch out for in 2025 : संपूर्ण भारतातल्या सिनेउद्योगात बॉलिवूडचा वरचष्मा राहिला आहे. एकूण सिनेमे, त्यांचं कलेक्शन, स्टारडम यात बॉलिवूड अर्थात हिंदी सिनेसृष्टीचा करिष्मा मोठा होता पण हे चित्र बदलतंय. २०२४मध्ये बॉलिवूड फारसा प्रभाव पाडू शकलं नव्हतंच. तमिळ चित्रपटांचे हिंदीत रिलीज होणे, हेही बॉलिवूडसाठी तापदायक होत आहे. मागील वर्षात पुष्पा २ ने १४०३ कोटींची कमाई केली, जी बॉलिवूडच्या टॉप ३ चित्रपटांच्या एकत्रित कमाईपेक्षाही जास्त आहे. त्यामुळेच रिरिलीजसारख्या ट्रेंड्सनी वेळ मारुन नेली. पण एकूणच सिनेउद्योगातल्या उलाढालीत बॉलिवूडचा टक्का घसरतोय का? हा घसरता टक्का वाढवण्यासाठी २०२५मध्ये बॉलिवूडला कोणत्या सिनेमांकडून विशेष अपेक्षा आहेत.