

विवेक पंडित- pvivek2308
@gmail.com
भारतीय संविधानाच्या पहिल्याच पानावरील उद्देशिकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक...’ अशी होते. संविधानाच्या निर्मात्यांनी ‘भारताचे लोक’ केंद्रस्थानी ठेवले आहेत. त्यामुळे संविधानातील मूलभूत हक्क, उत्तरदायित्व हे भारतीय लोकांनी स्वत:प्रति अर्पण केलेलं आहे. शासनाचे विविध निर्णय, सर्व कायदे, योजना या भारतीय लोकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केल्या जातात आणि राबवल्या जातात. त्यामुळे तो भारतीय लोकांचा हक्क आहे.