

कॅनडात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना कदाचित मास व्हिसा कॅन्सलेशनला सामोरं जावं लागू शकतं.
ई सकाळ
Explained: Canada’s Plan to Cancel Thousands of Student Visas and Its Impact on Indians
कॅनडा आणि भारताचे संबंध गेले काही वर्ष काही फारसे बरे नाहीत. त्यातच आता कॅनडा एकगठ्ठा व्हिसा कॅन्सलेशनचा विचार करत आहे. व्हिसा देणाऱ्या दूतावासातील अधिकारी वर्गालाच सरसकट एखाद्या ग्रूपचे व्हिसा कॅन्सल करून टाकण्याचा हा अधिकार आहे. त्यासाठी कॅनडाने अमेरिकेचीही मदत घेतल्याचं कळतंय.
पण ते ही भूमिका नेमकं कोणत्या समूहाविरुद्ध घेतायत. भारतीय विद्यार्थ्यांना याचा कितपत फटका बसणार आहे, भविष्यावर याचा कसा परिणाम होईल? सर्व जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.
नुकतेच कॅनडातील ओटावाने परदेशी विद्यार्थ्यांवर कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्याचा सगळ्यात जास्त परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर झालाय. ऑगस्ट २०२५मध्ये कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांचे बरेच अर्ज फेटाळले. म्हणजे एकूण भारतीय विद्यार्थ्यांच्या अर्जांपैकी तब्बल ७४ टक्के अर्ज फेटाळले गेले आहेत. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर प्रत्येक चार अर्जांतील ३ अर्ज फेटाळले गेलेत. ही नक्कीच धोक्याची घंटा आहे.