प्रा. अशोक मोडकअफगाणिस्तान, मध्य आशियाई देश (कझागस्तान इ.) आणि इराण या देशांचा प्रवास करायचा असेल, तर ‘चाबहार’ हे इराणी बंदर अतिशय उपयुक्त आहे. महत्त्वाचा पैलू म्हणजे पाकिस्तानच्या संमंतीची यासाठी आता भारताला गरज नाही..गेल्या चार पांच वर्षात भारताच्या जवळपास असलेल्या देशात ज्या घटना घडल्या आहेत, त्यांचा विचार केल्यास भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तीन प्रकल्पांसाठी अनुकूल संकेत मिळत आहेत. यापैकी एक प्रकल्प आहे तो चाबहार बंदराचा. इराणच्या पर्शियन आखातात पाय सोडून बसलेले हे बंदर पुनश्च चर्चेत आले आहे. तसेच या चाबहार बंदरातून पुढे गेल्यास बंदरे अब्बासपासून इराणच्या खुश्कीच्या मार्गाद्वारे कॅस्पियन समुद्रातील अंजली बंदर गांठल्यास आपण थेट रशियातल्या सेन्ट पीटर्सबर्गपर्यंत झेप घेऊ शकतो. सेंट पीटर्सबर्ग ते मुंबईच्या न्हावा शेवा बंदरापर्यंत आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गिका यातून साकार होऊ शकते. ही आंतरराष्ट्रीय मार्गिका नक्कीच भारताला लाभदायक आहे. या दोन प्रकल्पांप्रमाणेच भारत - मध्य पूर्व युरोप आर्थिक मार्गिकाही वर्तमानात उत्साहाने चर्चिली जात आहे..भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात हे तिन्ही प्रकल्प लाखमोलाचे आहेत, म्हणूनच चाबहार प्रकल्पाप्रमाणेच इतर दोन्ही प्रकल्पांचा विचार आवश्यक ठरतो. खरं म्हणजे या शतकाच्या प्रारंभी भारताच्या पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी कार्यरत होते, तेव्हाच इराणचे चाबहार बंदर विकसित करण्याचा भारताने निर्णय घेतला होता. इराणही या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सातत्याने पाठिंबा देत आहे. पण अमेरिकेने सन २००५ पासून भारताशी मित्रत्वाचे संबंध वृद्धिंगत करण्याचे ठरविले; भारतालाही अमेरिकेशी मैत्री हवीच होती व आहे. दुर्दैवाने याच अमेरिकेला इराणशी संबंध ठेवणाऱ्या भारतासारख्या देशावर निर्बंध लावावेत हे धोरण प्रिय होते, परिणामत: चाबहार प्रकल्प कुलपात बन्दिस्त करणे भारताला अपरिहार्य होते. सन २०१५ मधे आश्चर्य म्हणजे इराण- भारत संबंधांवर प्रतिबंध लादणे अमेरिकेस अनावश्यक वाटले व चाबहार बंदर उभारणीस शुद्ध पक्ष दिसला. नंतर सन २०२४ पासून खुद्द इराणलाच चाबहार बंदर प्रकल्प फायद्याचा वाटू लागला. यावर्षी जानेवारीत चाबहार बंदर पूर्ण विकसित व्हावे असे अफगाणिस्तानलाही जाणवले, त्यातून या बंदराची उभारणी पुनः चर्चेत वाजू गाजू लागली आहे..इराण आणि अफगाणिस्तान पाकिस्तानप्रमाणेच इस्लामिक राष्ट्रे आहेत. अफणाण भूमीवर तर तालिबानी राजवटीने मांड ठोकली आहे, पण पाकिस्तान या देशाचे या दोन्ही इस्लामी राजवटींशी वैर वाढले आहे, कारण पाकिस्तानचे बलुचिस्तान आणि खैबर पख्तून ख्वा या दोन सीमावर्ती प्रांतांमधून पाकिस्तानात दहशतवाद पेरला जात आहे आणि इराण तसेच अफगाणिस्तान हे शेजारी देशच या दहशतवादाला खतपाणी पुरवीत आहेत, हा पाकिस्तानचा आरोप आहे. नेमक्या या शेजारी देशांनी पाकिस्तानवर हाच आरोप केला आहे. साहजिकच इराणला व अफगाणिस्तानला पाकिस्तानपेक्षा भारत जिवलग मित्र वाटत आहे.आपले परराष्ट्रसचिव विक्रम मिस्त्री या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी जानेवारी २०२५ मधे काबूलला जाऊन आले वास्तविक पाहता, तालिबान राजवटीस जगातल्या कैक देशांप्रमाणेच भारतानेही अद्याप मान्यता दिलेली नाही. पण चाबहार या इराणी बंदरापासून देलाराम या अफगाण गावापर्यंत २१८ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यासाठी भारताने दहा कोटी डॉलर एवढी रक्कम खर्चिली आहे. कोविडच्या काळामधे भारताने अफगाण नागरिकांना वांचविण्यासाठी अनमोल सहाय्य दिले आहेच. याव्यतिरिक्त अन्नधान्यही भारताने पुरविले आहे. भारताने यातून सिद्ध केले आहे की, अफगाणिस्तान, मध्य आशियाई देश (कझागस्तान इ.) आणि इराण या देशांचा प्रवास करायचा असेल, तर चाबहार हे इराणी बंदर अतिशय उपयुक्त आहे. महत्त्वाचा पैलू म्हणजे पाकिस्तानच्या संमंतीची यासाठी आता भारताला गरज नाही. .साहजिकच अफगाणी तालिबानी शासक बेहद्द खूष आहेत. इराणी शासकही आनंदात आहेत. पार्शियन आखातातले चाबदार बंदर मागे टाकून आपले जहाज इराणच्याच बंदरे अब्बासला पोचले व मग जहाजातून उतरुन इराणी भूमीवर आपण वाहनाने प्रवास सुरु केला अन् कॅस्पियन सागरातल्या बंदरे अंजली हे ठिकाण गाठले तर वर म्हटल्यानुसार रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग बंदरापर्यंत पोचणे याचा अर्थ उत्तर दक्षिण आंतरराष्ट्रीय वाहतूक मार्गिकेला नवीन ऊर्जा देणे. या मार्गिकेमुळे इराण, रशिया या दोन देशांना मुंबई गांठणे व नंतर हिंदी महासागरात प्रवेश करणे सुलभ होणार हे नक्की. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष या संदर्भात भारताला आडकाठी करतील हे भय नक्की आहे, पण जर अमेरिकेने भारताच्या या मार्गिकेत मोडता घातला तर चीन थेट मध्य आशिया, अफगाणिस्तान व इराण या राष्ट्रांशी ''पट्टा आणि रस्ता'' या रेशमी मार्गाच्या माध्यमातून अमेरिकेला आव्हान देऊ शकतो. किंबहुना ही शक्यता ध्यानात घेऊनच सन २०१५ मधे अमेरिकेने या प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. या इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी या दिशेने आपली कूटनीती मार्गस्थ झाली आहे..गेल्या काही वर्षातच दोन आय् व दोन यू नामक चतुष्कोनी आकृतिबंधास अमेरिकेने हिरवा कंदिल दाखविला आहे. इंडिया आणि इस्त्राईल म्हणजे दोन आय् तर युनायटेड स्टेट्स् आणि युनायटेड अरब एमिरेट्स् म्हणजे दोन यू... या चतुष्कोनी रचनेमुळे तसेच भारताने फ्रान्स, कतार आणि सौदी अरेबिया या राष्ट्रांशी मैत्रीचे मजबूत सेतू उभारल्यामुळे ‘इंडिया - मिडल् ईस्ट युरोप आर्थिक मार्गिका’ मूर्त रुप धारण करणार आहे. ही मार्गिकादेखील चीनच्या बेल्ट ॲंड रोड उपक्रमाला आव्हान देऊ शकते... सारांश, अमेरिका या मार्गिकेस विरोध करणार नाही. नरेंद्र मोदी नुकतेच फ्रान्सला भेट देऊन परतले आहेत. याच भेटीत ते मार्सेलिस या फ्रेंच बंदराचीही पायधूळ झाडून परतले आहेत. इंडिया-मिडल् ईस्ट - युरोप आर्थिक मार्गिकेसाठी मार्सेलिस म्हणजे युरोपचे प्रवेशद्वार आहे. याचा उल्लेख इथे अटळ आहे..भारताला सन २०४७ ची स्वातंत्र्यशताब्दी दिमाखात साजरी करायची आहे. त्यासाठी चाबहार या इराणी बंदराचा विकास व वर उल्लेखिलेल्या दोन मार्गिकांची वेगवान उभारणी नि:संशय बहुमोल भूमिका पार पाडणार आहे यात शंका नाही. इस्त्राईल - इराण युद्ध संपुष्टात आले आहे व या युद्धसमाप्तीमुळेही दोन आय् आणि दोन यू हा चौकोनी आकृतिबंध व भारताशी मध्यपूर्व-युरोप या प्रदेशांना जोडणारी आर्थिक मार्गिका ग्रहणमुक्त झाली आहे असे आपण म्हणू शकतो. “पुनः एकदा चाबहार चर्चेत " हा विषय किती प्रसंगाचित आहे हे वेगळे सांगण्याची गरज आहे कां ? या शतकांच्या प्रारंभी ज्या प्रकल्पाची बीजे रोवली गेली तो साकार होण्यास अडीच तीन दशके लागली असे म्हणतां येईल - पण विस्मृतीपेक्षा विलंब परवडला. नाही कां ?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.