
श्रीराम पवार
shriram1.pawar@gmail.com
आर्थिक आघाडीवर टोकाची विषमता वाढत असलेला देश आणि सर्वांत वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ही बिरुदं एकाच वेळेस लागत असतील तर विचार करावाच लागेल. जे देशात बरं घडेल ते राज्यकर्त्या पक्षाच्या महानायकाचं कर्तृत्व हे आधीच ठरलेलं असल्याने श्रेय प्रदान कार्यक्रमही यथासांग सुरू झाला हेही अलीकडच्या रीतीला धरून. मात्र स्वप्न आणि प्रत्यक्षातलं आयुष्य यात खूपच फरक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.