
डॉ. अमिता भिडे
महाराष्ट्रातील शहरे बकालपणा, अनियंत्रित वाढ या चक्रव्यूहामध्ये अडकली आहेत. सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. शहरांचे आराखडे होत असले, तरीही त्यामध्ये लोककेंद्री विकासाच्या कल्पना दिसून येत नाही आणि गृहीतकेही कागदावरच राहिलेली असतात. शहरांचा विकास करताना स्थानिकांच्या गरजा व अडचणी लक्षात घेऊन आराखडा तयार करण्याची गरज आहे.
भारताला नागरीकरणाचा साडेपाच हजार वर्षांचा इतिहास आहे. लोथल, हडप्पा येथील नगर नियोजन थक्क करणारे आहे, ही नागरी परंपरा अनेकदा खंडित झाली तरीही लोकरीतीतून, काही राजांच्या विचक्षण दृष्टीतून सुरू राहिली.