

China Belt and Road Initiative
esakal
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०१३मध्ये ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ची (बीआरआय) घोषणा केली. यामध्ये जगभरात पायाभूत सुविधा उभारणे आणि गुंतवणूक करण्याचे धोरण त्यांनी जाहीर केले होते. यातूनच चीनने अनेक गरीब विशेषतः आशिया व आफ्रिकेतील देशांमध्ये बंदरे, रेल्वे, महामार्ग, पूल, धरणे, पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामांना सुरुवात केली. या प्रकल्पांसाठी चीनच्या बँकांकडून या देशांना कर्जे देण्यात आली आहेत. ‘एड डाटा’ने दिलेल्या माहितीनुसार, १६५ देशांमध्ये १३,४२७ प्रकल्पांचे काम सुरू आहे. या सर्व प्रकल्पांचे एकत्रित मूल्य ८४७ अब्ज डॉलर आहे.