पुणे: आपण मोठमोठ्या रकमांचे इन्शुरन्स घेऊन निर्धास्त होते हे खरे आहे पण ही टर्म इन्शुरन्सची रक्कम आपल्यानंतर खरोखरच आपल्या आप्तेष्टांना मिळते का..? याची खात्री करायची मात्र राहून जाते. कोव्हीड काळानंतर जवळपास सगळ्यांनाच टर्म इन्शुरन्सचे महत्व समजले आहे.. खासकरून तरुण पिढीला.
खरं तर जिथं उद्या काय होईल याची खात्री नाही अशा काळात साधारण ३० ते ४० वर्षानंतर गोष्टी कशा असतील याचा आपण अंदाज देखील बंधू शकत नाही. पण तरीही आज म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण नक्कीच करत असतो..
मोठ्या रकमेच्या 'टर्म इन्शुरन्स' चा जेव्हा आपण विचार करतो.. तेव्हा त्याची विश्वासार्हता हा देखील तितकाच महत्वाचा विषय असतो.. 'टर्म इन्शुरन्स' हा विषय आपली आर्थिक सुरक्षा, जबाबदाऱ्या या सगळ्यांशीच निगडित असल्यामुळे तो घेताना कंपन्यांनी दाखवलेल्या आकड्यांवर विश्वास ठेऊन तो घ्यायचा..? तर नक्कीच नाही.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? पारंपरिक इन्शुरन्स पेक्षा तो वेगळा आणि महत्वाचा का ठरतो? तो घेताना नक्की कोणत्या गोष्टी पहायला हव्यात? कंपनीची निवड कशी करावी? एकुणातच काय गोष्टी महत्वाच्या? समजावून घेऊया 'सकाळ प्लस' च्या माध्यमातून..