

From Presence to Influence: The Real Story of Women in Indian Boardrooms
E sakal
कंपनी कायद्यानुसार संचालक मंडळात महिला प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. पण कायद्यातल्या किमान मर्यादेपलिकडे कंपन्या जाताना दिसत नाहीत. परिणामी संचालक मंडळात केवळ नियमाची पूर्तता करण्यासाठी बसवल्याप्रमाणे स्त्रिया दिसतात. त्यातल्या निर्णय घेणाऱ्या किंवा त्यावर प्रभाव टाकणाऱ्या खरंच कितीजणी हा वेगळाच प्रश्न.
अगदी शार्क टँकसारखा स्टार्टअपला चालना देणारा कार्यक्रम पाहिला तरी त्यांच्या तिसऱ्या सीझनमध्येसुद्धा आलेल्या स्पर्धकांमध्ये फक्त ३० टक्के महिला होत्या. हेच चित्र अधिक विस्ताराने कंपन्यांच्या संचालक मंडळात आणि वरिष्ठ पातळीवर दिसतं.
खैतान अँड कंपनी, aon आणि Ladies Who Lead यांच्या Presence to Influence: Advancing Women in Indian Boardrooms या नव्या अहवालात याच विषयांवर अधिक खुलासे करण्यात आले आहेत.