
When Cough Syrup Turns Deadly
E sakal
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात खोकल्याच्या एका औषधामुळे नऊ बालकांनी जीव गमावला. या औषधामुळे मुलांची मूत्रपिंडं निकामी झाल्याचं दिसलं होतं. सप्टेंबरमध्ये सुरू झालेलं हे मृत्यूचं सत्र दिवसेंदिवस वाढत आहे.
खोकल्याच्या या औषधामध्ये डायएथिलीन ग्लायकॉल नावाचं विषारी रसायन असल्याचं तपासात सिद्ध झालं. सरकारने आता त्यावर बंदी घातली आहे, औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचं स्पष्ट कारण अद्याप पुढे आलेलं नाही. एकूणच कफ सिरप प्रकरण तापत आहे.
औषधातील विषारी रसायनांसंबंधी एक प्रकरण जवळपास ३० वर्षांपूर्वी गाजलं होतं. नायजेरियातील कानो इथे फायझर या कंपनीने काही औषधांची बेकायदा चाचणी घेतली होती आणि त्यात अनेक बालकांचा मृत्यूही झाला होता.
फायझर ही तीच कंपनी जिने कोविड काळात लशी बनवल्या होत्या...
नायजेरियातल्या कानोची काँट्रोव्हर्सी नेमकी काय आहे? शिवाय पालक म्हणून आपण मुलांना कोणतंही औषध देताना काय काळजी घ्यायला हवी? सविस्तर वाचा, सकाळ प्लसमध्ये.