
Narendra Modi and Starmer meet in india
MI5 Tip-Off and Jaggi Johal Arrest: The Untold India–Britain Angle
Khalistan, Human Rights, and Diplomacy: The Jagtar Singh Johal Controversy
ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर सध्या भारत दौऱ्यावर आहेत. जुलैमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर स्टार्मर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. स्टार्मरनी सोबत जवळपास दीडशेजणांचा प्रातिनिधीक मंडळही आणलं आहे.
या दौऱ्यात अनेक व्यापारी करार आणि देशाच्या राजकीय धोरणांवर चर्चा तर होणार आहेच पण याच भेटीत भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकाच्या सुटकेसाठी प्रयत्न होतील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.
जगतरसिंग जोहाल असं नाव असलेल्या या नागरिकावर खलिस्तानला पाठिंबा देण्याचा आरोप आहे. कॅनडातील खलिस्तानवाद्यांचं वादळ शमतंय तोच ब्रिटनमध्येही त्याने जोर धरणं भारतासाठी धोक्याचं आहे. इतकंच नव्हे तर भारतीय वंशाच्या पण ब्रिटनचा नागरिक असलेल्या जोहालची सुटका आणि अटक दोन्ही भारतासाठी अडचणीच्या गोष्टी आहेत.
काय आहे विषय सविस्तर समजून घेऊ.