Premium|Critical care insurance benefits : केवळ मेडिक्लेम पुरेसा नाही! गंभीर आजार आणि पगाराच्या नुकसानीपासून वाचवेल 'क्रिटिकल केअर इन्शुरन्स'

Health insurance riders for critical illness : सामान्य मेडिक्लेम व्यतिरिक्त गंभीर आजारांमुळे होणारे उत्पन्नाचे नुकसान भरून काढण्यासाठी 'क्रिटिकल केअर इन्शुरन्स' एकरकमी आर्थिक कवच प्रदान करतो.
Critical care insurance benefits

Critical care insurance benefits

esakal

Updated on

सुधाकर कुलकर्णी-sbkulkarni.pune@gmail.com

बदलत्या जीवनशैलीमुळे गंभीर आजारास सामोरे जावे लागते व त्या अनुषंगाने खर्चही होत असतो. पण आरोग्य विम्यामुळे आर्थिक भरपाई सुलभ होत असल्याने आता बहुतेक जण आरोग्य विमा घेत आहेत. मात्र, आजारपणामुळे व्यावसायिक किंवा नोकरीतील पगाराचे नुकसान झाल्यास, त्याची भरपाई मिळत नाही. यासाठी क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी घेणे गरजेचे असते.

सर्वसाधारणपणे मेडिक्लेम पॉलिसीमुळे पॉलिसीधारकास आजारपणामुळे रुग्णालयातील प्रत्यक्ष खर्च किंवा जेवढे पॉलिसी कव्हर आहे, या दोन्हीतील कमी असणाऱ्या रकमेइतकी भरपाई (रीएम्बर्समेंट) मिळते. मात्र, आजारपणामुळे झालेले व्यावसायिक नुकसान किंवा पगाराचे नुकसान याची भरपाई मिळत नाही. बऱ्याचदा ही रक्कम मोठी असते, यामुळे रुग्ण बरा झाला, तरी आर्थिक अडचणीत येऊ शकतो. यावर उपाय म्हणजे आवश्यक त्या कव्हरची क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी घेणे. नेमकी ही पॉलिसी कशी असते, तिचे फायदे-तोटे काय याची माहिती जाणून घेऊ या.

क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी ही वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य विमा पॉलिसी आहे, ज्यामुळे कर्करोग, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनी निकामी होणे आणि पॅरालिसिस यांसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांमध्ये आर्थिक संरक्षण मिळते. या पॉलिसीत समाविष्ट असणाऱ्या आजाराचे निदान झाले, तर पॉलिसी कव्हरची रक्कम पॉलिसीधारकास एकरकमी दिली जाते. ही एक पूरक आरोग्य विमा पॉलिसी असून, आपल्या नेहमीच्या आरोग्य विमा पॉलिसीला पर्याय नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तुम्ही आयुर्विमा; तसेच आरोग्य विमा पॉलिसीला जोडून क्रिटिकल इलनेस कव्हर घेऊ शकता किंवा ते स्वतंत्रपणेही खरेदी करू शकता. असे असले, तरी शक्यतो स्वतंत्रपणे क्रिटिकल इलनेस पॉलिसी घेणेच हितावह असते.

Critical care insurance benefits
Premium|Travel Insurance : प्रवासी विमा पॉलिसी कशासाठी?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com