esakal | स्कॅन क्यूआर कोड, फसवणुकीचा नवा ‘मोड’
sakal

बोलून बातमी शोधा

स्कॅन क्यूआर कोड, फसवणुकीचा नवा ‘मोड’}

स्मार्टफोनवरील वेगवेगळ्या वॉलेटच्या माध्यमातून ‘क्यूआर कोड’ स्कॅन करत आर्थिक व्यवहार केला जातो. परंतु क्यूआर कोडच्या या सोप्या आणि सरल व्यवहारातून तुमचीही फसवणूक होऊ शकते, हे माहिती आहे का?

स्कॅन क्यूआर कोड, फसवणुकीचा नवा ‘मोड’

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे - कोरोनामुळे डिजिटल पेमेंटला बूस्टर मिळाला आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटचे देशात अनेक ‘मोड’ ॲक्टिव्ह झाले आहेत. स्मार्टफोनवरील वेगवेगळ्या वॉलेटच्या माध्यमातून ‘क्यूआर कोड’ स्कॅन करत आर्थिक व्यवहार केला जातो. परंतु क्यूआर कोडच्या या सोप्या आणि सरल व्यवहारातून तुमचीही फसवणूक होऊ शकते, हे माहिती आहे का? विविध प्रकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सामानाची खरेदी विक्री किंवा घर भाड्याने घेण्यासाठी फसवणूक करणारे लष्करात असल्याचे भासवत ‘क्यूआर कोड’द्वारे नागरिकांची आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

घरातील किरकोळ सामानापासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत सर्वांच्या खरेदीचे व्यवहारांसाठी ‘क्यूआर कोड’ वापरण्यात येत आहेत. मात्र, डिजिटल पेमेंटच्या या पद्धतीचा गैरवापर करत अनेक लोकांची फसवणूक केली जात आहे. अनेकवेळा लष्करातील विविध पदांवर कार्यरत असल्याचे सांगून नागरिकांची आर्थिक फसवणुकीचे प्रमाण विशेषतः ओएलएक्स, क्वीकर, नो ब्रोकर्ससारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा प्रकार घडत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

लष्करावरील नागरिकांचा विश्‍वास असल्यामुळे लष्कराचाच नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. सायबर गुन्ह्यांमधील सुमारे ७० टक्के गुन्हे हे ऑनलाइन बिझनेस आणि ऑनलाइन बँकिंगचे आहेत. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत सोबत व्यवहार करताना क्यूआर कोड, लिंक किंवा ओटीपी यासारख्या गोष्टींचा वापर करणे टाळावे. तसेच समोरचा व्यक्ती लष्करात असल्याचे सांगत असला तरी त्याची संपूर्ण माहिती नसल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार करू नये.- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

हेही वाचा: मेस्सी-बार्सिलोना; दोघांत तिसरा जुनं सगळं विसरा!

गेल्या महिन्यात एका व्यक्तीने लष्करात कार्यरत असल्याचे सांगत फ्लॅट भाड्याने मागितला आणि स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी काही ओळख पत्र पाठविले. त्यानंतर मला घरभाडे देण्यासाठी एक क्यूआर कोड पाठविला आणि पेमेंटच्या पुष्टीकरण यासाठी तो स्कॅन करण्यास सांगितले. त्यावेळी शंका आली आणि त्वरित पोलिसात तक्रार दाखल केली असता समजले की या व्यक्तीवर अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. - योगेश हांडगे, तक्रारदार

क्यूआर कोड म्हणजे काय?

कोणत्याही प्रकाराच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स’ (क्यूआर) हा स्कॅन करण्याचा पर्याय आता मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. अगदी लहान विक्रेतेसुद्धा त्यांच्या ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरण्याचा किंवा पेमेंट करण्याचा पर्याय देतात. ग्राहकांच्या सोयीसाठी, सर्व बँकिंग आणि ई-वॉलेट अॅप्स क्यूआर कोड वाचन करण्याचे सॉफ्टवेअर प्रदान करतात.

हेही वाचा: सुनंदाचे जीवन म्हणजे 'कापूस कोंड्याची गोष्ट'!

फसवणुकीबद्दल

- डिपॉझिट कन्फर्मेशन म्हणून क्यूआरकोडचा वापर

- आगाऊ पेमेंट घेण्यासाठी कलेक्ट रिक्वेस्टच्या माध्यमातून फसवणूक

- आकर्षक खरेदीचे आमिष दाखवून क्यूआर कोडद्वारे फसव्या पेमेंट स्वीकारल्या जातात.

फसवणूक टाळण्यासाठी

- खात्यात पैसे जमा करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले गेले तर त्यातून फसवणूक होऊ शकते

- अज्ञात लाभार्थींकडून संकलित विनंत्या कधीही मंजूर करू नका

- एखादा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर नाव, लॉगिन आयडी, पासवर्ड, पत्ता आदी वैयक्तिक माहिती विचारल्यास ते पूर्णपणे टाळा

- तुमच्या खात्यात पैसे मिळवण्यासाठी, कोणत्याही पिनची आवश्यकता नाही

- क्यूआर कोडमध्ये काय लपलेले आहे हे शोधण्यासाठी क्यूआर कोड कधीही स्कॅन करू नका

- सार्वजनिक ठिकाणी क्यूआर कोड वापरताना सावधगिरी बाळगा

हेही वाचा: राजधानी मुंबई : चाळ, टॉवर आणि घसरणारा टक्का!

फसवणुकीबाबत शहरातील स्थिती

- जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ पर्यंत अर्ज - ८०

- प्रलंबित अर्ज - ४५

- सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारी - ४

- पोलिस ठाण्याकडे चौकशीसाठी पाठविलेले तक्रारी - ३०

- गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविलेली तक्रार - १

go to top