
defense technology revolution in India
esakal
हर्ष काबरा
harshkabra@gmail.com
अमेरिका आणि इतर देशांमध्ये तंत्रज्ञान कंपन्या संरक्षणक्षेत्राशी वाढत्या प्रमाणात भागीदारी करत आहेत. भारतातदेखील आयडेक्सच्या पाठबळावर खासगी कंपन्या लष्करी तंत्रज्ञानात पुढे येत आहेत. आत्मनिर्भरतेचा मार्ग सुस्पष्ट होत असला, तरी अजून अनेक आव्हाने आहेत.
सिलिकॉन व्हॅली म्हटलं, की भांडवलशाहीच्या डिजिटल जादूगारखान्यातल्या दिवसरात्र पेटलेल्या प्रयोगशाळा डोळ्यांसमोर येतात, जिथे स्टार्टअप्सना बाळसं मिळते आणि गुंतवणूकदार पैशांचा पाळणा हलवतात. जिथे चमकत्या स्क्रीनवर जन्म घेणाऱ्या स्वप्नांनी झपाटलेल्या मंदिरात ‘नेक्स्ट बिग थिंग’ म्हणजे देव, तर व्हेंचर कॅपिटल त्याची आरती ठरतंय.