'Digital Addiction' and Mental Health
Esakal
पुणे - तुम्ही विशीतले किंवा तिशीतले आहात आणि तुमचा दिवसभरातला बराचसा वेळ हा सोशल मिडिया किंवा व्हिडिओ बघण्यात जात असेल तर कदाचित तुमच्यामुळे देशाचं नुकसान होतंय. असं कोणी अमुक तमुक व्यक्ती म्हणत नाहीये तर थेट देशाच्या २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात म्हणजेच ‘इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया २०२५-२६’ मध्ये या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.
भारतात गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात डिजिटायजेशन झालं खरं पण या डिजिटायजेशननंतर भारतातील अनेक तरूण हे डिजिटली अडिक्टेड झाले असल्याचं यंदा पहिल्यांदाच भारताच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे होणारं नुकसानही यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. एवढंच नाही तर काही राज्यांमध्ये सोशल कनेक्टेडनेसचा अभ्यास केल्यानंतर लोकांच्या मानसिक आरोग्यावर याचा कसा परिणाम होतो आहे हे देखील मांडण्यात आलं आहे. यामध्ये आयुष्य संपवण्यापर्यंत लोक विचार करतात आणि या सगळ्यामुळेच देशावर परिणाम होत असून याबाबत धोरण ठरवणे गरजेचे असल्याचेही यात सुचवण्यात आले आहे.
काय आकडेवारीचा दाखला देत हा विषय स्पष्ट करण्यात आला आहे, जागतिक पातळीवर काय स्थिती आहे, भारत सरकार यासाठी काय करतंय आणि भविष्यात काय धोरणं आखण्याच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखातून.