रामायण महाभारतातली दिवाळी कशी होती?; जाणून घ्या देवांचं दिवाळी कनेक्शन

दिवाळी या सणाला जवळपास अडीच हजाराहून अधिक वर्षांचा इतिहास
diwali festival How Diwali was celebrated in Ramayana Mahabharat Diwali of Gods
diwali festival How Diwali was celebrated in Ramayana Mahabharat Diwali of Godssakal
Summary

दिवाळीचा सण हा वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. भारतासोबतच जगभरात जिथे जिथे भारतीय स्थायिक झालेत, तिथेही ते मोठ्या उत्साहात आणि दिमाखात दिवाळीचा सण साजरा करतात

दिवाळीचा सण हा वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. भारतासोबतच जगभरात जिथे जिथे भारतीय स्थायिक झालेत, तिथेही ते मोठ्या उत्साहात आणि दिमाखात दिवाळीचा सण साजरा करतात. या सणाला जवळपास अडीच हजाराहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. आणि त्यामुळेच दिव्यांच्या प्रकाशात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गोडधोड फराळासोबत साजऱ्या होणाऱ्या या सणाविषयी अनेक आख्यायिका आणि कथा आहेत. दिवाळीबद्दल सामान्यत: माहिती नसलेली एक गोष्ट अशी की, दिवाळी सणाशी फक्त हिंदूच नव्हे तर, जैन आणि शीख धर्मातील बड्या देवांचाही सहभाग आढळतो. या दिवाळी सणाशी आपल्या देवांचं कसं कनेक्शन आहे ते समजून घेऊयात. दिवाळीची सुरुवात कधी झाली हे नेमकं सांगणं कठीण असलं, तरी पुराणकथेत देवांचा या दिवाळी सणाशी कसा संबंध आहे, ते बघूयात-

१.राम-लक्ष्मण-सीता

आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की, रामायणातल्या दिवाळीनुसार १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येला परतले होते. यावेळी त्यांच्यासोबत बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीताही उपस्थित होती. रावणाकडून सीतेचं अपहरण होईपर्यंत हे तिघेही एका नदीच्या किनाऱ्यावर खुशालीचं जीवन जगत होते. पण, रावणानं सीतेचं अपहरण केलं, आणि रामानं बराच काळ तिचा शोध घेतला आणि अखेर रावणाच्या तावडीत असलेल्या सीतेची सुटका करुन ते घरी परतले. त्यानंतर राम आणि त्यांचे साथीदार जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा सर्वांनी मोठ्या आनंदात त्यांचं स्वागत केलं. त्यामुळे दिवाळीत राम अयोध्येला परत येणं म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असं म्हणून दिवाळीला अनन्यसाधारण महत्व आहे.

२.लक्ष्मी

लक्ष्मी म्हणजे भाग्याची देवी.. दिवाळी सणाशी संबंधित लक्ष्मी ही प्रमुख देवी आहे. आणि तिची कथाही रंजक आहे. कथेप्रमाणे, अहंकाराच्या दुनियेतून इंद्रदेवता एकदा लक्ष्मीला दैवी जग सोडून दुधाळ समुद्रात प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त करतो; मग देवी समुद्रात प्रवेश करताच संपूर्ण जग एका अंधाऱ्या जागेत परिवर्तित होतं. त्यानंतर सर्व देव मात्र देवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करतात. त्यानंतर जवळपास १ हजार वर्षे दुधाळ सागराचं मंथन केल्यानंतर अखेर लक्ष्मीचा पुनर्जन्म झाला. कमळाच्या सुंदर फुलावरील पृष्ठभागावर देवी अवतरली आणि पुन्हा एकदा तिच्या सौभाग्याचा आशीर्वाद जगाला मिळाला. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीसह सौभाग्य आणि समृद्धी आपल्या घरात यावी यासाठी अंधाऱ्या रात्रीतही दिव्यांचा लखलखाट केला जातो.

३. भगवान श्रीकृष्ण

दक्षिण भारतात नरकासुराचा वध करुन विजय मिळवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या विजयाची कथा दिवाळीत महत्वाची मानली जाते. नरकासुराला ब्रह्मदेवानं अशी शक्ती दिली होती की, तो केवळ आपल्या आईच्या हातानेच मरू शकतो. त्यामुळे आपल्यावरील अगाध प्रेमामुळे आपली आई आपल्याला कधीही ठार मारणार नाही, असा नरकासुराला विश्वास होता. मात्र, नरकासुराच्या आईचा कृष्णाची पत्नी सत्यभामा म्हणून पुनर्जन्म झाला, जिने तिचा पती कृष्णाला जखमी केल्याचं पाहून नरकासुराला युद्धात जीवघेणा धक्का दिला. आणि त्यावेळी मरतानाही नरकासुरानं विनंती केली की, कुणीही त्याच्या मृत्यूचा शोक करु नये; याउलट त्यानं जगलेलं आयुष्य उत्सवरुपी साजरा करावं. त्यामुळेच दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो, असंही दक्षिणेकडे म्हटलं जातं.

४. बळीराजा

लाडक्या राजा बळीच्या पृथ्वीवर परत येण्याच्या सन्मानार्थ बलिप्रतिपदा म्हणून दिवाळीचा चौथा दिवस साजरा केला जातो. दानशूर, प्रजाप्रेमी आणि सत्यवचनी असा एक राजा होता. ज्याने तिन्ही लोकांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. त्यामुळे लोकांमध्ये देवांपेक्षाही अधिक चर्चा याच राजाची होती. त्यामुळेच देव संतापले आणि त्यांनी भगवान विष्णूला या राजाला संपवण्यासाठी पाठवलं. यावेळी विष्णूनं एका ठेंगण्या व्यक्तीचा म्हणजेच वामनावतार धारण केला आणि तो बळीराजासमोर गेला. यावर राजानं तुला काय हवं? असं विचारलं. त्यावर वामन ‘फक्त त्रिपादभूमी हवी मला’ असं उत्तरला. तिथे राजा वामनाला ‘दिली भूमी’ असं म्हणाला. त्यानंतर वामनाने एका पावलात स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली आणि तिसरं पाऊल कुठे ठेऊ? असं विचारताच बलिराजानं आपलं मस्तक पुढे केलं आणि वामन अवतारातील विष्णूनं त्याला पाताळात गाडलं. पण, बळीराजाची दानशूरता पाहून वामन आनंदी झाला. त्यानं बळीला दरवर्षी एक दिवस पृथ्वीवर परत जाण्याचा अधिकार दिला. आणि तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा.

५. महाभारत

प्राचीन हिंदू महाकाव्य महाभारतात पांडू राजाची ५ मुलं म्हणजेच ५ पांडव होते. एकदा सारीपाटाच्या खेळात पराभूत झाल्यानंतर पांडवांना १२ वर्षांसाठी वनवासाची आज्ञा देण्यात आली. पण, याच पांडव बंधुंवर लोकांचं मनापासून प्रेम होतं. आणि १२ वर्षांचं वनवास करुन परतण्याच्या दिवशी लोकांनी या ५ पांडवांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. त्यावेळी शहराच्या सर्व रस्त्यांवर दिव्यांची रोषणाई आणि लखलखाट करण्यात आला होता. आणि त्यालाच महाभारतातली दिवाळी म्हटलं जातं.

६. कालिमाता काली, विनाशाची देवी..

लक्ष्मीनंतर कालिमाता ही सुद्धा दिवाळी सणाशी संबंधित प्रमुख देवता आहे. आणि याच कालिमातेची पश्चिम बंगालमध्ये पूजा केली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार कालिमातेचा जन्म राक्षसांच्या क्रूर अत्याचारापासून स्वर्ग आणि पृथ्वीला मुक्त करण्यासाठी झाला होता, असं म्हटलं जातं. तरी, सर्व राक्षसांचा वध केल्यानंतर कालीचं नियंत्रण सुटलं, तिच्या हातून विनाश सुरुच राहिला. अखेर भगवान शंकरानं हस्तक्षेप करुन कालिमातेच्या क्रोधावर आणि विनाशावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे कालीच्या पश्चात्तापाचा दिवस म्हणून दिवाळी साजरी केली जाते. यावेळी कालिमातेच्या अद्भुत शक्तीला आदरांजली म्हणूनही आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दिवाळीचा सण साजरा केला जातो.

७. भगवान महावीर

आतापर्यंत आपण हिंदू देवदेवतांच्या पौराणिक कथा आणि त्याचा दिवाळीशी संबंध पाहिला. तरी, जैनांच्याही दिवाळी उत्सवाशी संबंधित परंपरा आहेत. सहाव्या शतकातील दिवाळीच्या वेळी उत्सवाच्या निरीक्षणाच्या पहिल्या ऐतिहासिक नोंदींच्या सुमारास ज्ञानप्राप्ती झाली. महावीर हे जैन धर्मातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचे निर्वाण प्राप्ती हे मुख्य कारण आहे की जैन बांधव मागील अगणित पिढ्यांपासून हिंदूंसोबत दिवाळी सण साजरा करताहेत. सहाव्या शतकातील ऐतिहासिक अशा नोंदीत अशाच पहिल्या दिवाळीची नोंद आढळते.

८. गुरु हरगोबिंद

शीख धर्मातही दिवाळीला अनन्यसाधारण महतत्व आहे. हिंदू आणि जैनधर्मीयांप्रमाणेच शीख बांधव बंदी छोड दिवस साजरा करतात. शीख परंपरेनुसार, गुरु हरगोबिंद यांच्या तुरुंगातून सुटकेचं स्मरण करणारा हा दिवस आहे. १७ व्या शतकात गुरु हरगोबिंद यांना मुघल साम्राज्यात अटक करण्यात आली होती. एक वर्षभर ते तुरुंगात होते. आणि त्या काळात शीख परंपरेनुसार गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी शीख बांधव एकत्र येतात आणि फटाके वाजवून हा दिवस साजरा करतात. त्यानुसार दरवर्षी श्री हरमंदिर साहिब, तसेच संपूर्ण परिसर हजारो चमकणाऱ्या दिव्यांनी सजवला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com