
festive sales
E sakal
Festive Cheer or Short-Term Spike? The Real Story Behind Diwali Sales
दिवाळीचे दिवस आहेत. भारतातल्या बाजारांतून तुफान गर्दी दिसतेय. खरंतर हे वर्ष काही फार बरं गेलेलं नाही. पंजाबातही पूरपरिस्थिती होती, महाराष्ट्रात पूरपरिस्थितीतून अजून सावरलेला नाही. देशांतही अनेक घडामोडी झाल्या पण तरीही दिवाळीला बाजार ओसंडून वाहताना दिसतो आहे. भारतीय ग्राहकवर्ग पुन्हा एकदा वाहनविक्रीपासून ते कंझ्युमर गुड्सपर्यंत अनेक गोष्टींची जोरदार खरेदी करतोय. त्यात जीएसटीतील कपात हा मुद्दाही आहेच. पण ही उभारी कितपत टिकेल? सणासुदीचा हा आनंद केवळ क्षणिक ठरणार की बाजाराला खरंच उत्साह देणार?