
Media and society
esakal
शीतल पवार
‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकरांनी १९५४ मध्ये राजकारण आणि समाजाची केलेली चिकित्सा आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीलाही तंतोतंत लागू होते. आज जयंतीच्या निमित्ताने नानासाहेबांचे स्मरण करताना सामाजिक नेतृत्वाच्या त्यांच्या संकल्पना समाजासमोर पुन्हा एकदा मांडाव्या लागणार आहेत.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
या श्लोकावर प्रचंड श्रद्धा असलेल्या समाजाचा आपण भाग आहोत. त्यामुळे सामाजिक प्रश्न असो वा सरकारी; एखादा ‘महानायक’ येऊन यातून आपल्याला तारून नेईल अशी बहुसंख्य समाजाची अपेक्षा असते. परिणामी तसे नायक काही प्रश्नांभोवती जन्मालाही येतात. सरकार दरबारीही नेते - अधिकारी स्वतःची ही ‘नायका’ ची प्रतिमा निर्माण करून समाजाचा विश्वास मिळवायचा प्रयत्न करताना दिसतात. आणि या सगळ्यात महत्त्वाची ठरतात ती माध्यमे. फक्त पारंपरिक माध्यमेच नव्हे तर आता नवमाध्यम आणि नवमाध्यमकर्मीही.