
मोहन रमन्
अमेरिकेचे जागतिक स्तरावरील वर्चस्व पहिल्या महायुद्धानंतर वाढतच गेले. आता उतार सुरू झाला आहे. अमेरिकेला पुन्हा तो प्रभाव निर्माण करायला पुढील कित्येक वर्षेही लागू शकतात, हे वास्तव लक्षात घेत आपण आपले धोरण आखायला हवे.
सो व्हिएत संघाचे विभाजन झाल्यानंतर, जगात शांतता नांदेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याऐवजी जगभर संघर्ष वाढत जाऊन त्यानंतरच्या काळात जगात आर्थिक आणि लष्करी संघर्ष एकमेकांवर आधारले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अणुयुद्धाच्या शक्यतेपासून, व्यापार, ऊर्जानिर्मिती ते दुर्मीळ खनिजांवरील मक्तेदारीपर्यंत अनेक मुद्द्यांवर संपूर्ण जगाचे भवितव्य हे काही निवडक देशांच्याच हाती, अशी स्थिती निर्माण झाली आहे.