
डॉ. किशोर कुलकर्णी
युद्धाचे अनर्थकारण हा साऱ्या जगासाठीच चिंतेचा विषय. रशिया-युक्रेन युद्धामुळे त्या देशांच्या झालेल्या आर्थिक नुकसानाचा आढावा प्रस्तुत लेखकाने याआधी घेतला होता. या लेखात भारतावरील आर्थिक दुष्परिणामांची मीमांसा.
इराण-इस्राईल संघर्षात अमेरिका उतरली. त्यानंतर अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले केले. दुसरीकडे इराणनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांनी कतारमधील अमेरिकी लष्करी तळांवर क्षेपणास्त्रहल्ला केला. गेल्या दोन महिन्यांपासून इस्राईल आणि इतर देशांसोबतचा संघर्ष सुरू आहे, तर दुसरीकडे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ युक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे. या युद्धांचे भारतावर परिणाम होतील का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातो.