
सुनील चावके
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन एप्रिल रोजी कोणती आर्थिक घोषणा करणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिका पुकारत असलेले शुल्क युद्ध जागतिक व्यापार संघटनेच्या संकल्पनेचे, आंतरराष्ट्रीय व्यापार संकेतांचे, बहुपक्षीय, द्वीपक्षीय व्यापार करारांचे उल्लंघन करणारे असेल.
म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या रिश्टर स्केलवरील ७.७ तीव्रतेच्या भूकंपात बँकॉकमधील सर्वच बहुमजली इमारतींना जबरदस्त धक्के बसले. एका आलिशान बहुमजली इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील स्वीमिंग पूल तर समुद्रात भरतीच्या लाटा उसळल्यागत दोलायमान होऊ लागला आणि त्यातील पाणी उसळून इमारतीबाहेर पडू लागल्याचे दृश्य सर्वांनी बघितले.