elon musk statement about ambani
Esakal
पुणे - Is Ambani the real boss of India? असं वक्तव्य दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने भारताच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आघाडीवर असणाऱ्या व्यक्तीविषयी केलं आहे. पण हा वाद फक्त दोन श्रीमंत व्यक्तीविषयी नाही. तर भारतात येत्या काळात येऊ घातलेल्या सॅटेलाइट इंटरनेट सुविधेविषयीचा आणि त्यातील आर्थिक गणितांचा आहे.
८ ऑक्टोबर २०२६ ला स्टारलिंकचे मालक आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर भारताच्या बाजारपेठेवर आणि स्टारलिंकच्या मंजुरीवरून टीका करताना थेट अंबानी यांच्या नावाचा उल्लेख केला. या पोस्टमध्ये मस्क यांनी प्रश्न उपस्थित केला की, “स्टारलिंककडे जगातील १६५ पेक्षा जास्त देशांचे परवाने आहेत... मग भारतात अजूनही परवाना का नाही? अंबानी हेच भारताचे खऱ्या अर्थाने बॉस आहेत का?”
त्यांच्या या व्यक्तव्यानंतर भारतातल्या सामान्य नागरिकांना आता प्रश्न पडला की, मुळात इलॉन मस्क असं का म्हणाले? स्टारलिंकचं भारतात येणं आणि अंबानींचा काय संबंध? स्प्रेक्टम वाटप आणि त्यामागची आर्थिक गणितं काय, या सगळ्यात राष्ट्रीय सुरक्षेचा विचार काय आहे..? हा सगळाच विषय खूप गुंतागुंतीचा आहे म्हणूनच सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून हा विषय आपण नीट समजून घेऊया...