
EPFO चे नवे नियम सामाजिक सुरक्षिततेसाठी धोकादायक?
E sakal
EPF Pension and Settlement Rules Tightened: What It Means for You
भविष्य निर्वाह निधी म्हणजेच Provident Fund हा अनेकांचा आधार असतो. नोकरीतून निवृत्त झाल्यावर पीएफच्या पैशांनी अमुक घेतलं तमुक घेतलं असं ऐकलेलं असतं. पण या बचत केलेल्या पैशांच्या वापराविषयी नवे नियम तयार होत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)अंशतः पैसे काढण्याचे नियम पूर्णपणे बदलले आहेत.
नव्या पद्धतीप्रमाणे आधी अस्तित्वात असलेले १३ वेगवेगळे आणि गुंतागुंतीचे नियम एकत्र केलेत.
आता फक्त तीन प्रमुख गटांमध्ये या नियमांची विभागणी केली आहे.
मूलभूत गरजा (Essential Needs),
घराशी संबंधित गरजा (Housing Needs)
आणि विशेष परिस्थिती (Special Circumstances)
या नव्या सुधारणेमुळे सुमारे ३० कोटी पीएफ धारकांसाठी पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि सोपी होईल, असा दावा केलाय. हे बदल कोणते आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार? या सुधारणांविषयी तज्ज्ञ काय म्हणतात, सविस्तर जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.