Is IPL ruining the balance between bat and ball
esakal
IPL: Is Cricket Becoming An ‘Entertainment Factory’? आयपीएल हे मनोरंजन आहे... यात तुम्ही क्रिकेट शोधायला जाऊ नका... हे आम्ही नाही, तर महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन म्हणतोय... तो सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज प्रशिक्षक आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गोलंदाजांची काय अवस्था होतेय, हे आपण सारेच पाहतोय. मुथय्या, ज्याच्या नावावर कसोटीत ८००, वन डेत ५३४ विकेट्स आहेत, याला आयपीएलमधील गोलंदाजांचं दुःख समजलं.
काही दिवसांपूर्वी जेव्हा दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेले २६४ धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने ७ चेंडू आणि ६ विकेट्स राखून सहज पार केले, तेव्हा युझवेंद्र चहल व हरप्रीत ब्रार यांची एक रिल व्हायरल झालेली... त्यात दोघंही म्हणतात, तुमच्या मुलाला क्रिकेटपटू बनवायचं असेल तर त्याला फलंदाज बनवा, गोलंदाजांची काय दुर्दशा होतेय, हे तुम्ही पाहताय... खरंच आयपीएल ही इंटरटेनमेंटसाठी बनवलेली स्पर्धा आहे, परंतु या झगमगाटाकडे पाहून मुलं बेसिक क्रिकेट खेळायला विसरले आहेत? आयपीएलच्या निमित्ताने सकाळ + ने लिहिलेला हा विशेष लेख..