अरेरे.. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाला पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचे सिलेक्शन चुकले, शुभमन गिलला नेतृत्व करणे नाही जमले, साई सुदर्शनला खेळवण्याचा गौतम गंभीरचा हट्ट अंगलट आला... असे बरेच वाद आता सुरू आहे. मंगळवारी या कसोटीचा निकाल लागला आणि अजूनही काय चुकलं, कोण चुकलं याचे चर्वितचर्वण सुरू आहे. पण, हरलो म्हणजे संपलं सर्व, असे नाही. या पराभवातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि बऱ्याच सकारात्मक गोष्टीही आहेत.