

financial management tips
esakal
पंकज पाटील-fincircleindia@gmail.com
अनेकांना आर्थिक व्यवस्थापन ही कंटाळवाणी गोष्ट वाटते; पण आश्चर्याची बाब म्हणजे एका सर्वेक्षणातून असे स्पष्ट झाले आहे, की जे जोडपे आपले कर आणि आर्थिक नियोजन एकत्र समजून घेऊन आणि समन्वयाने करते, त्यांचे वैवाहिक जीवन अधिक स्थिर आणि यशस्वी ठरते. आर्थिक विषयांवर संवाद आणि पारदर्शकता हे नात्यातील विश्वास वाढवितात. वैवाहिक जीवनासाठी संवाद आणि प्रामाणिकपणा आवश्यक असतो, तसेच आर्थिक नियोजनातही परस्परसंवाद असणे तितकेच महत्त्वाचे असते.
वाहानंतरचे नवे आयुष्य सुरू करताना जोडप्याने आपल्या आर्थिक बाबींवर गंभीरपणे विचार करणे, तसेच आर्थिक सल्लागाराचे (Financial Advisor) योग्य मार्गदर्शन घेणे, हे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याचे मूलभूत पाऊल आहे.