Financial Planning for Women; Relying on Others Can Be a Mistake: प्रतिभा एका शाळेत शिक्षिका... साधारण महिना लाखभर रुपये पगार. अभ्यासात कायमच हुशार असणारी प्रतिभा बाकी गोष्टीतही अत्यंत हुशार.. आपल्या कामात सतत वेगवेगळं शिकणारी, राहणीमान देखील काळाच्यासोबत असाणारं.. घरचं, दारचं अगदी हुशारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडणारी.. रोज गाडीवर शाळेत जाणारी. पण जेव्हा त्याच गाडीत पेट्रोल भरायची वेळ यायची तेव्हा हे काम एकतर ती मुलांना सांगत किंवा नवऱ्याला सांगत. स्वत:ला पैसे हवे असत तेव्हाही तिला ते नवऱ्याकडेच मागावे लागत. कारण तिचा पगार तिने कधीच बॅंकेत जाऊन काढला नाही. तिच्या मते मला त्याची गरजही नाही. माझा माझ्या कुटुंबावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी केलं काय आणि मी केलं काय.. त्याने काय फरक पडतो..?
आज आपण घराघरात अशा स्त्रिया पाहतो ज्या महिन्याला लाख लाख रुपये पगार घेतात पण त्यांच्याकडे स्वतःचे एटीएम कार्ड देखील नसते. त्यांचे सगळे पैसे हे त्यांचा नवरा किंवा घरातील मोठे पुरुष गुंतवत असतात. किंवा पेंशन घेणाऱ्या आयांचे पैसे ही त्यांची मुलं गुंतवत असतात.
वरवर पहाता यात गैर काहीच नसते. मात्र यामुळे महिला आर्थिक नियोजनात मागे पडतात का.? जेव्हा अचानक त्या संकटात सापडतात तेव्हा त्यांना आर्थिक निर्णय घेणं अवघड जातं का..? व्यक्ती म्हणून स्वतःचं वेगळेपण ठेवायला त्या कमी पडतात का..? तर हो. अगदी सरसकट नाही मात्र महिला स्वतःच्या आर्थिक नियोजनात पुरुषांच्या तुलनेत मागे आहेत. संशोधनानेदेखील हे सिद्ध केले आहे.
हे संशोधन नेमके काय..? स्त्रियांनी स्वतःचे आर्थिक नियोजन करत असताना काय चुका टाळायला हव्यात तसेच कोणत्या गोष्टी पाळल्या तर त्या अधिक सक्षमपणे स्वतःचे नियोजन अधिक चांगले करू शकतात जाणून घेऊया या 'सकाळ प्लस' च्या विशेष लेखातून...