

Fixed Deposit (FD)
esakal
डॉ. वीरेंद्र ताटके - tatakevv@yahoo.com
आ जच्या आधुनिक काळात तरुण पिढीला बँकेतील मुदतठेव अर्थात ‘एफडी’ हा स्थिर आणि पारंपरिक गुंतवणूक पर्याय कालबाह्य वाटतो. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, ईटीएफ यांसारख्या पर्यायांमध्ये असलेली चढ-उतारांची रोमांचकता तरुणांना अधिक आकर्षित करते; त्यामुळे ‘एफडी’सारखी साधी, स्थिर गुंतवणूक त्यांना ‘बोअरिंग’ वाटते. या विषयावरील शिक्षक आणि विद्यार्थ्यांतील संवाद...
अनिकेत : नमस्कार सर, येऊ का? तुम्हाला फोन केला आणि लगेच निघालोच.
शिक्षक : अरे वा! इतक्या पटकन! आत्ताच पाच मिनिटांपूर्वी फोन केला होतास ना? आणि तुझ्या चेहऱ्यावरचं ते भाव काय सांगतायत? जबरदस्त वैतागलेला दिसतोयस.
अनिकेत : (खुर्चीवर बसत, वैतागून) काय सांगू सर, एक तर बाहेर एवढं ऊन पडलं आहे. रस्त्यावरून येताना अक्षरशः डोकं भणभणायला लागलं आणि त्यात आमच्या बाबांचा डोक्याला ताप!
शिक्षक : (हसत) उन्हावर माझा काहीही इलाज नाही रे. फार तर तुला लिंबू सरबत देऊ शकतो; पण बाबांचा ताप म्हणजे नक्की काय प्रकरण आहे?