पुणे : माझ्या सगळ्या भावंडांची मुलं इंग्रजी माध्यमात आहे. मला मराठीचा अभिमान आहेच, मला मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालायला आवडेलही; पण जेव्हा माझं मूल माझ्या भावंडांच्या मुलांसोबत खेळत तेव्हा ते वेगळं पडेल की काय अशी मला भीती वाटतेय.. आणि सगळं जग एकीकडे जात असताना आपणच काय मराठी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालण्याचा निर्णय घ्यावा..?
अक्षता.. तिचं मूल सध्या ९ महिन्यांचं आहे.. पण तिच्या बाळाने पुढे कोणत्या माध्यमात जावे या विषयी त्यांना आतापासूनच कोणती शाळा निवडावी, कोणतं बोर्ड निवडावं याची काळजी वाटतेय.. सध्या ती आपल्या मित्रमंडळींची मुलंबाळं कोणत्या शाळांमध्ये जातात याची माहिती घेते आहे.
प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या भविष्याविषयी काळजी वाटत असते. त्यातून अनेकदा ते आजूबाजूला काय चाललं आहे याकडे डोकावतात..? आजूबाजूचे, नातेवाईक, मित्रंमंडळींची मुलं कोणत्या बोर्डाच्या शाळेत जातात.? कोणत्या माध्यमाच्या शाळेत जातात..? त्यांना कोणते क्लास लावण्यात आलेत..? अगदी घरात खेळणी कोणती घ्यायची, कार्टून्सचे कोणते चॅनेल घ्यायचे इथपासून सगळं आजूबाजूला डोकावून अनेक पालक ठरवत असतात.
प्रत्येकालाच आपल्या मुलाला किंवा मुलीला सगळ्यात बेस्ट जे आहे तेच द्यायचे असते.. पण ते खरोखरच आजूबाजूचे पालक काय देतायेत हे बघून देणे गरजेचे की आपल्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीची, मुलांच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा आणि पालक व मुलांच्या शारीरिक आणि मानसिकतेचा विचार करून देणे गरजेचे आहे..?
अशा वेळी पालक म्हणून गोंधळून जायला होत असेल... काहीतरी सुटतंय अशी भीती वाटत राहते.. एक व्यक्ती म्हणून सुद्धा या गोष्टी आपल्यासोबत होत असतात.. पण जेव्हा पालक म्हणून होतात तेव्हा आई बाबा म्हणून आपण अधिकच काळजीवाहू विचार करू लागतो.. पण असे होत असेल तर काय करावं..? आणि या fomo मधून मध्यम मार्ग काढत कसं बाहेर पडावं..? याबद्दल काही संशोधन झालंय का..? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या लेखाच्या माध्यमातून..