पुणे: लोकांमध्ये प्राण्यांबद्दल प्रेम फार पूर्वीच्या काळापासून आहे.. पूर्वी तुमच्याकडे गाई म्हशी किती आहेत हे पाहून लग्न जमवली जात आताही तोच ट्रेंड व्हायरल होतो आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की मला जोडीदार हवा आहे.. किंवा यंदा कर्तव्य आहे पण माझा जोडीदार हा प्राणी प्रेमी हवा.. तर आणि तरच तो माझा जोडीदार असू शकेल..
जोडीदाराची निवड करताना तो जोडीदार याच राशीचा हवा, निर्व्यसनीच हवा, त्याची पत्रिकाच अशी हवी अशा गोष्टींच्या बाबतीत लोक खूप जास्त आग्रही असतात.. या गोष्टी नव्या नाहीत पण आता प्राणी प्रेमी असणे याचा सुद्धा मूलभूत अटींमध्ये समावेश होतो आहे.
काय असतात हल्लीच्या लग्नाच्या, प्रेमसंबंधात अडकण्यापूर्णीच्या, डेटिंगच्या बद्दलच्या अटी, डबल इन्कम नो कीड विथ पेट असा विचार लोक का करत आहेत, डेटिंग ॲप मधले ट्रेंड्स काय सांगतात? आणि एकुणाताच प्राणी प्रेमी असणं आणि प्रेमसंबंध याविषयी कपल काय विचार करतात? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या विशेष लेखातून...