

India Women Script History with Their Maiden World Cup Triumph.jpg
esakal
India Women created history by winning the ICC Women’s World Cup 2025 : आधी ऑस्ट्रेलिया आणि फायनलला दक्षिण अफ्रिका अशा तगड्या संघांना नमवत भारताच्या पोरींनी दणका उडवून दिला.
क्रिकेट म्हणजे game of Gentleman असं म्हटलं जात असे. तथाकथित सभ्य लोकांच्या खरंतर पुरुषांच्या या मैदानात मुलींना फारसं स्थान नव्हतंच. त्यात भारतातल्या महिला क्रिकेटला तर शिकाऊ टाइप किंवा नेहमीच्या क्रिकेट टीमची लिंबूटिंबू टीमच म्हटलं जायचं.
पोरींचं क्रिकेट म्हणजे भातुकलीचा खेळ असली जहरी टीकासुद्धा झालीय. पण या सगळ्याला मागे टाकत २ नोव्हेंबरच्या रात्री भारताच्या लेकींनी खरंच मैदान मारलं. प्रथम बॅटिंग करताना पोरींनी २९८ धावा चोपल्या इतकंच नव्हे तर द. अफ्रिकेला २४६ धावांतच गुंडाळलं.
हे सगळं कसं शक्य झालं, या यशाच्या मागे असणाऱ्या मराठी माणसाचं योगदान नेमकं काय, संघातल्या प्रत्येकीचा स्ट्रगल नेमका होता कसा, हे जाणून घेण्यासाठी वाचा, सकाळ प्लसचा हा विशेष लेख.