
उदय गायकवाड
‘खवय्यांचं गाव कोल्हापूर’ असं म्हटल्यास ते अगदी योग्यच ठरतं. इथं चवीनं खाणारे लोक आहेत. सर्वार्थानं समृद्धी असलेल्या या गावाला आदरातिथ्याची झालर आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला मनापासून खाऊ घालण्याची इथली संस्कृती आहे.
इथली पारंपरिक खाद्यपदार्थांची चव जपतानाच नव्यानं येणाऱ्या खाद्यपदार्थांनाही जोखून आपलंसं करण्यात कोल्हापूरकर मागे नाहीत. त्यामुळेच इथं आंतरराष्ट्रीय ब्रँडही अगदी दिमाखात उदरभरण करताना दिसतात.