
अरविंद रेणापूरकर
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर अण्वस्त्रयुद्धाची भीती व्यक्त होत होती. दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज असल्याने कोणतीही ठिणगी जगाला नव्या संकटात ढकलू शकते, याची चिंता वाढली होती. दुसरीकडे, ट्रम्प यांनी अमेरिका युरोपची अण्वस्त्रढाल नसेल, असे जाहीर करून युरोपीय देशांना स्वतंत्र धोरणाचा विचार करण्यास भाग पाडले. रशिया-युक्रेन युद्ध, गाझातील संघर्ष आणि भारतीय उपखंडातील तणाव यामुळे युरोपीय देशांना अमेरिकेला वगळून नव्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागणार आहे.