Premium|Financial Planning : गणरायाच्या रूपातून आर्थिक नियोजनाचे धडे कसे शिकाल?

Investment Planning : गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्रीगणेशाच्या रूपातून आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीचे महत्त्व समजून घेता येते. गणरायाच्या विविध अवयवांतून आर्थिक शिस्तीचे महत्त्वपूर्ण धडे मिळतात.
Financial Planning

Financial Planning

esakal

Updated on

सुधाकर कुलकर्णी - sbkulkarni.pune@gmail.com

गणेशोत्सवास लवकरच सुरुवात होत आहे. या गणेशोत्सवात आपल्या बहुतेकांच्या घरी गणपती येणार असतीलच; शिवाय आजूबाजूलाही विविध मंडळांचे गणपती असतील. या आठ-दहा दिवसांत संपूर्ण वातावरण गणरायांच्या जयजयकाराने दुमदुमून जाते. कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करताना आपण प्रथम गणेशाला वंदन करून आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्याच्याकडे प्रार्थना करतो. चला तर, या शुभपर्वात आपण आपल्या आर्थिक नियोजनाचा आणि त्यानुसार आर्थिक गुंतवणुकीचा श्रीगणेशा करू या.

गद्धी, विवेक आणि समृद्धीचे दैवत असलेल्या श्रीगणेशाचे रूप आपल्याला केवळ आध्यात्मिक मार्ग दाखवत नाही, तर आर्थिक नियोजन कसे करावे, याचे उत्तम धडेही देते. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणरायाच्या मूर्तीतील विविध अवयवांतून आपण गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाबाबत काय शिकू शकतो, हे पाहू या. श्रीगणेशाची ही विलोभनीय मूर्ती शांतपणे न्याहाळत असताना आपल्याला गुंतवणुकीबाबत खूप चांगले मार्गदर्शन मिळू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com